रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 37

  • 2.7k
  • 1k

अध्याय 37 बिभीषणाचे श्रीरामांकडे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ त्यानंतर काही न बोलतां शांतपणे बिभीषण प्रधानांसह तेथून परतला : बिभीषणासी अपमान । जालिया नव्हे क्रोधायमान ।स्वयें श्रीराम स्मरोन । सावधान बैसला ॥ १ ॥कांही न बोलोनि उपपत्ती । विचारोनि विवेकयुक्ती ।शरण जावें श्रीरघुपती । निश्चयो चित्तीं दृढ केला ॥ २ ॥ बिभीषणाचे विचार : चौघे घेवोनि प्रधान । स्वयें निघाला बिभीषण ।रावणासी मधुर वचन । काय आपण बोलत ॥ ३ ॥आम्ही तुम्ही सखे बंधु । अणुमात्र नाहीं विरोधु ।सांगतां तुजला हितानुवादु । वृथा क्रोधूं तुवां केला ॥ ४ ॥निंदोनियां लंकानाथा । श्रीरामा वाणिलें स्वपक्षार्था ।तरी मी जाईन अधःपाता । जाण