रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 19

  • 3k
  • 1.3k

अध्याय 19 लंकादहन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दाढी – मिशा जळाल्यामुळे रावणाची उडालेली धांदल : पुच्छाग्नि फुंकितां रावण । भडक्यानें उठला हुताशन ।हनुमंत पित्यासी सांगे आपण । करीं अपमान रावणा ॥ १ ॥एकोनि पुत्राचें वचन । वायु वन्हि प्रज्वळून ।रावणाचें मुख पोळून । केलें दहन खांडमिशां ॥ २ ॥अपमानला दशानन । ओष्ठ पोळले दारूण ।शंख करूं न शके रावण । टिरी पिटोन आक्रंदें ॥ ३ ॥उफराटें शंखस्फुरण । गुद त्राहाटोनि करी रावण ।प्रथम पावला अपमान । पुच्छदहन भलें नव्हे ॥ ४ ॥रावणा विचारी विवेकमार्गी । आम्हीं पुच्छासीं लाविली आगी ।तें हित आम्हांलागीं । वानर सर्वांगीं निःशंक ॥ ५ ॥छळोनि जाळितां