रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 3

  • 3.6k
  • 1.2k

अध्याय 3 सुग्रीवाशी सख्य ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीवाला स्नेहसंबंध जोडण्यासाठी श्रीराम पाचारण करितात : वालिसुग्रीवजन्मकथा । ऐकोनि सुख श्रीरघुनाथा ।संतोषोनियां हनुमंता । होये बोलता श्रीराम ॥१॥सख्य करावें सुग्रीवासीं । हे मुख्य कर्तव्य आम्हांसी ।तूंही सख्यार्थ आलासी । अतिशयेंसी सुख जालें ॥२॥कबंधे सांगीतले मजपासीं । हृतदारदुःख सुग्रीवासी ।सुखी करावया तयासी । ऋष्यमूकासी मी आलों ॥३॥जो मज होय अनन्य शरण । त्याचें दुःख निर्दाळून ।सुखी करावें संपूर्ण । ब्रीर्द जाण हें माझें ॥४॥दुःख निरसूनि सुख द्यावयासी । मी आलों वनवासासी ।वेगीं बोलावी सुग्रीवासी । सुखी त्यासी मी करीन ॥५॥ऐकोनि श्रीरामाचें वचन । हनुमंत जाला सुखसंपन्न ।वंदोनि श्रीरामाचे चरण । केले उड्डाण