रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 2

  • 3.4k
  • 1.2k

अध्याय 2 सुग्रीवाची जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूतोऽहं प्रेषितस्तेन सुग्रीवेण महात्मना ।राजा वानरमुख्यानां हनूमान्नाम वानरः ॥१॥युवाभ्यां स हि धर्मात्मा सुग्रीवः सख्यमिच्छति ।तस्य मां सचिवं विद्धि वानरं पवनात्मजम् ॥२॥ हनुमंत सुग्रीवाचा जन्मवृत्तांत विचारतो : हनुमंत सांगे श्रीरामासी । मज सुग्रीवें तुम्हापासीं ।धाडिले पहावया वृत्तांतासी । सख्य तुम्हांसीं करावया ॥२॥देवदैत्यदानवांसी । रिघु नव्हे या वनासी ।तेथें येतां तुम्हां मानवांसी । वानरांसी विस्मयो ॥३॥धीर वीर गंभीरता । तुम्हां दोघां देखोनि येतां।भयें आश्चर्य सुग्रीवाच्या चित्ता । निःशंकता देखोनि ॥४॥ सुग्रीवाची शोचीय अवस्था व इच्छा, मारुतीची भूमिका व श्रीरामांचे आश्वासन : हृतदार हृतस्वार्थ । सुग्रीव वाळिभयें भीत ।तुमचा इच्छितो साह्यार्त । मज तदर्थ धाडिलें