रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 7

  • 3.8k
  • 1.3k

अध्याय 7 जटायूसह श्रीरामांचे पंचवटीत आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अमृतरक्षणासाठी घेतलेली दक्षता : अच्युत नाम धरोनि मानसीं । गरुड निघाला अमृतासी ।भावें वंदितां कश्यपासी । साह्य् सप्तऋषी त्यासी जाले ॥ १ ॥गरुडें अतिक्रमोनि गगन । सूक्ष्मरुप धरोनि जाण ।परमामृत लक्षितां पूर्ण । तव बहु रक्षण अमृतासी ॥ २ ॥प्रथम सर्पांचें संपूर्ण । दुसरें रक्षण वरुण ।तिसरें जाण यक्षगण । मरुद्गण तें चवथें ॥ ३ ॥पांचवें रक्षण यमदूत । सहावे रक्षण शिवदूत ।सातवे रक्षण विष्णुदूत । सावचित्त सर्वदा ॥ ४ ॥ योग्य वेळी गरुडाचे आक्रमण : गरुडें साधोनयां सवडी । कुंडीं घालोनियां उडी ।अमृत शोपोनियां तातडीं । अति झडाडी निघाला