रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 26

  • 15.6k
  • 3.4k

अध्याय 26 श्रीरामपरशुरामएकात्मबोध निरूपणं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लग्नाचे वर्‍हाड अयोध्येकडे निघाले : चौधी बहिणींसहित जाण । जालें जानकीपाणिग्रहण ।जनकें केली बोळवण । सुख संपूर्ण दशरथासी ॥ १ ॥चौघे पुत्र चौघी सुना । कीर्ति न समाये त्रिभुवना ।येव्हढे आल्हादें जाणा । अयोध्याभुवना निघाला ॥ २ ॥संनद्ध केलिया दळभार । महामदें गर्जती कुंजर ।घंटाकिंकिणीं सालंकार । पताकीं अंबर शोभत ॥ ३ ॥घोदे नाचविती वीर । जी जी मा मा थीर थीर ।तीपायीं असिवार । अति अरुवार नाचती ॥ ४ ॥अढाऊ झेली साबळधर । कोयतेतकार धनुर्धर ।चालती पायांचे मोगर । अलगाइत बाणाइत ॥ ५ ॥वोढणिये थैकार देत । जेठिये तळपत चमकत ।ऐसें