रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 2

  • 9.6k
  • 5k

अध्याय 2 ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ यज्ञपुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग राजा पाहे राष्ट्र सकळ । तंव फिटले द्वंद्वदुःखदुष्काळ ।पाहिला सर्वत्र सुकाळ । अफळ ते सफळ वृक्ष झाले ॥ १ ॥प्रजा स्वानंदे निर्भर । गोगोधनां आनंद थोर ।अग्निहोत्रें घरोघर । याग द्विजवर यजिती सुखें ॥ २ ॥पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण । कोणा नाहीं दुःख दैन्य ।घरोघरीं वेदाध्ययन । हरिकीर्तन हरिभक्ती ॥ ३ ॥भूतळा येईल राघव । यालागीं वैकुंठींचें वैभव ।पुढे धाडिले जी सर्व । तेणें शोभा अपूर्व अयोध्येसीं ॥ ४ ॥ अयोध्येत इंद्राच्या अप्सरांचे आगमन राजा शोभे सिंहासनीं । अति आल्हाद राजभुवनीं ।आनंद न माये त्रिभुवनीं । तंव स्वर्गाहूनि आल्या देवांगना