पसायदान आता विश्वात्मकें देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ।।१।। जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मि रति वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जिवाचे ।।२।। दुररितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसुर्ये पाहो। जो जें वांच्चील तो ते लाहो प्राणिजात ।।३।। वर्षते सकलमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूतळी । भेटो तया भूता ।।४।। चला कल्पतरुचे अरव । चेतना चिंतामणीचे गांव । बोलते ते अर्णव पियूषाचे ।।५।। चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतू ।।६।। किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होऊनि तिही लोकी। भजोजो जो आदिपूरुशी अखंडित ।।७।। आणि