श्यामची आई - पुस्तकाची समीक्षा

  • 38.2k
  • 10.6k

श्यामची आई: मूल्य शिक्षणाचे विद्यापीठ! शासनाला मूल्य निश्चित करून, शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो परंतु आई नावाचे असे एक विद्यापीठ आहे, तिथे शेकडो मूल्यं कोणतेही प्रशिक्षण न घेता, अत्यंत जिव्हाळ्याने, आत्मीयतेने शिकविले जातात, अंगी बाणवले जातात अगदी अशिक्षित माता असली तरीही! श्यामची आई! पांडुरंग सदाशिव साने अर्थात सानेगुरुजी यांच्या आईने लहानपणापासूनच श्यामवर केलेल्या संस्काराचे अत्यंत मार्मिक भाषेतील लेखन म्हणजे श्यामचे आई हे पुस्तक! विविध प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित झालेले हे पुस्तक आज घराघरात आहे. सुप्रसिद्ध लेखक, वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या पुस्तकाच्या संदर्भात लिहितात... 'अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर