मॅनेजरशीप - भाग ४

  • 6.6k
  • 1
  • 3.5k

मॅनेजरशीप भाग ४   भाग 3 वरुन  पुढे वाचा ........   दुसऱ्या दिवशी मधुकर जरा लवकरच फॅक्टरी मध्ये पोचला. आदल्या रात्री सातपुते जे काही सांग होते त्यावरच डोक्यात विचार चालू होते. कार मधून उतरता उतरताच त्यांच्या लक्षात आलं की ट्रक लोडिंग चालू आहे. मधुकरला आश्चर्य वाटलं. आज तर कुठलेच dispatches नव्हते. असते तर त्याला माहीत असायला हव होतं. काय प्रकार आहे ते बघायला तो ट्रक पाशी गेला. तिथे स्टोर ऑफिसर बर्डे उभे होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली लोडिंग चालू होतं. “काय बर्डे कोणाच मटेरियल पाठवता आहात ?” – मधुकर. “साहेब मटेरियल नाहीये. स्क्रॅप पाठवतो आहे.” – बर्डे. “एकदम अचानक ?” –