असा हि रंग

  • 4.7k
  • 1.7k

"ये पळा नाहीतर भैया रंगवणार "अशी आरोळी करत १० -१२ वर्षाची मुले पळत होती "कुठे पळणार तुम्ही मी तर आज तुम्हाला रंगवणार म्हणत गौरव ने आपल्या लहान भावंडांवर रंग फेकले आज दरवर्षी प्रमाणे मयेकर कुटूंबीय एकत्रित रंगपंचमी चा आनंद घेत होते घरचा परिसर विविध रंगानी तसेच संगीतानी दणाणून गेला होता मयेकर कुटुंब म्हणजे प्रख्यात घरगुती वस्तूचे व्यवसायिक आणि राजकारणाशी निगडित असलेले एकत्रित कुटुंब आणि त्याची रंगपंचमी म्हणजे बघण्यासारखी सगेसोयरे नातेवाईकांना हि आमंत्रण असल्याने बरीच लोक जमली होती सकाळी सुरु झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी कुठे संपला तसे सगळे जण घरात परतले सगळेच जण थकून गेले होते कुटुंबाचे प्रमुख घनश्याम मयेकर ज्यांना