होल्ड अप - प्रकरण 3

  • 8.1k
  • 5k

होल्ड अप प्रकरण ३ “ प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, उत्तरादाखल तुम्ही मला प्रति प्रश्न नका विचारू.” पाणिनी कडाडला. “ हो.” साक्षीदार म्हणाली. “ आणि तुम्हाला हे माहीत होतं की ओळख परेड च्या रांगेत, जे वेगवेगळे लोक असतील त्यात आरोपी असणार?” “ हो.”-मरुशिका “ आणि आरोपीला तुम्ही फोटो वरून आधीच ओळखलं होतं?” “ होय.” “ ज्यावेळी मिस्टर कामोद यांनी तुम्हाला आरोपीचा फोटो दिला, त्यावेळी त्यांनी तुम्हाला आरोपी शिवाय इतरही काही माणसांचे फोटो दिले का? आणि असं विचारलं का, की या पैकी कोणत्या माणसाने होल्ड अप केला असं वाटतंय? ”-- पाणिनी म्हणाला. “ नाही, असं नाही केलं त्याने. तो म्हणाला, मरुशिका, आपला