होल्ड अप - प्रकरण 2

  • 9.2k
  • 1
  • 5.6k

होल्ड अपप्रकरण २“ तुम्ही आरोपीला खूप कमी कालावधी पाहिलंत?” आपल्या आवाजात सहजपणा आणत पाणिनी ने विचारलं.“ कमी कालावधी कशाला म्हणायचं हे व्यक्ती नुसार बदलतं पटवर्धन. ” ती उर्मट पणे म्हणाली.“ म्हणजे कदाचित एक मिनिटा पेक्षा कमी?” पाणिनी ने विचारलं.“ कदाचित.” मरुशिका म्हणाली“ अर्ध्या मिनिटापेक्षा ही कमी? ”“ असेल.कदाचित.”-मरुशिका“ तुम्ही सिया माथूर बरोबर गाडीने व्हिला नंबर दोन मधे आलात.?”“ हो.”“ किती अंतर होतं ? होल्ड अप झाल्याच्या ठिकाण पासून ते व्हिला नंबर दोन ?” पाणिनी ने विचारलं.“ अर्धा किमी पण नसेल.”-मरुशिका“ किती वेळ लागला जायला?”- पाणिनी ने विचारलं.“ काही मिनिटंच लागली.”-मरुशिका“ होल्ड अप चं नाट्य घडायला जेवढा वेळ लागला, त्याच्या चौपट