होल्ड अप - प्रकरण 1

  • 18k
  • 10k

होल्ड अप प्रकरण १ गेली पंधरा मिनिटे, हे सर्वांच्याच लक्षात येत होतं की सरकारी वकील आरुष काणेकर सतत कोर्टातल्या घड्याळाकडे बघत , मनात अत्यंत काटेकोर पणे वेळेची नोंद करत साक्षीदाराला प्रश्न विचारत होता.वेळकाढू पणा करण्यासाठी अधून मधून उगाचच आपल्या नोट्स चाळत होता, तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता. अचानक तो ताठ उभा राहिला आणि म्हणाला, “ दॅट्स ऑल युवर ऑनर.” नंतर पाणिनी कडे वळला आणि म्हणाला, “ यू मे क्रॉस. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे?” पाणिनी उठून उभा राहिला. आरुष काणेकर ने आपल्या पुढे टाकलेला सापळा त्याने ओळखला. “ युअर ऑनर, कोर्टाचं कामकाज संपायला फक्त वीस मिनिटं बाकी आहेत.”