आरोपी - प्रकरण १८ शेवटचे प्रकरण

  • 7.8k
  • 3.7k

अर्ध्या तासाने न्या.मंगरुळकर आपल्या आसनावर येऊन बसले. “ विखारे यांची सर तपासणी पूर्ण झाल्ये का तुमची?” त्यांनी पाणिनी ला विचारलं. “ पूर्ण नाही झाली खरं तर, पण तो कोर्टात हजर नाहीये. पण तारकर इथे आहे, त्याला मी काही प्रश्न विचारू इच्छितो.” & इन्स्प.तारकर पिंजऱ्यात हजर झाला. “ तुझो ठशांची तुलना पूर्ण झाली का? काय निष्कर्ष आहेत तुझे?” “स्टील च्या पॅड वरचे विखारेचे ठसे हे कुलर आणि बॅटरी वरच्या ठशांशी तंतोतंत जुळले.” तारकर उत्तरला. “ अत्ता विखारे कुठे आहे तुला माहिती आहे?” पाणिनी ने विचारलं. “ अगदी अद्ययावत ठाव ठिकाण माहिती आहे त्याचा.” –तारकर. “ सांग.” “ कोर्टातून अर्ध्या तासापूर्वी बाहेर