सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ८

  • 7.6k
  • 2.8k

सनातन धर्मात वृक्ष, वनस्पती, प्राणी आणि पक्षी तसेच जलस्रोतांना विशेष महत्त्व आहे. या धर्मात नद्यांना पवित्र आणि मातेसमान मानले गेले आहे. तलावांबद्दल बोलायचे झाले तर, सनातन धर्मात ज्या पाच तलावांचे वर्णन केले गेले आहे आणि जे तलाव पौराणिक काळाशी संबंधित आहेत. असे मानले जाते की या तलावांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो.अशा पवित्र तलावांपैकी एक म्हणजे "पंपा सरोवर"कर्नाटक राज्यातील कोपल जिल्ह्यात आहे. हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये याचा समावेश आहे. त्यात स्नान केल्याने पुण्य मिळते आणि आत्मिक सुख प्राप्त होते अशी मान्यता असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू धर्माला मानणारे भाविक पंपा सरोवरात स्नान करण्यासाठी येतात.कमळ फुलण्याच्या