शालिनीच काय चुकलं ? - भाग ३ - अंतिम भाग

  • 12.1k
  • 4.6k

शालिनीचं काय चुकलं ?   भाग 3 भाग २  वरुन पुढे वाचा संचालकांनी इतक्या नी:संदिग्ध शब्दांत पाठिंबा जाहीर केल्या मुळे शालिनीबाई आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच धीर आला. त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. दोन दिवस भेटायला येणाऱ्यांची रिघ लागली होती. शालिनीबाई बऱ्याच लोकप्रिय शिक्षिका होत्या. आणि शालिनीबाईंच्या हातून असं काही कृत्य घडेल यावर कोणाचाच विश्वास बसला नव्हता. इतक्या साऱ्या लोकांचा विश्वास पाहून शालिनीबाई भारावून गेल्या. त्यामुळे गाडी पूर्वपदावर यायला मदत झाली. काळ हे उत्तम औषध असतं म्हणतात. शालिनीबाई सुद्धा शाळेच्या कामात रुळल्या. सर्व गोष्टीत पूर्वी प्रमाणेच रस घेऊ लागल्या. पोलिसांचा तपास चालूच होता. सर्व पुरावे गोळा करणं चालू होतं. संबंधित लोकांचे जाब, जबाब