सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ५

  • 7.1k
  • 3.2k

विठ्ठल मंदिर पाहता पाहता दुपार होत आली.. बरीच पायपीट केल्याने सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. हंपी बघताना तुम्हाला चालण्याची तयारी ठेवावी लागते.. तरच तुम्ही मनापासून एन्जॉय करू शकता. अन् त्यासाठी वेळेवर अन्न आणि पाणी घेतलंच पाहिजे..आमच्या गाईडने आम्हाला तिथल्या एका स्थानिक खानावळीत नेलं. टेबल खुर्ची तर होत्याच पण त्याबरोबरच जमिनीवर गाद्या टाकून समोर बसक्या पद्धतीची जेवण ठेवण्यासाठी अशी टेबल साध्या भाषेत सांगयचं तर आपली भारतीय बैठक !! केळीच्या पानावर चपात्या, दोन तीन प्रकारच्या भाज्या, चटणी त्यावर तूप, भात, रस्सम आणि खास कर्नाटकी पद्धतीची गोड खीर.. एकंदरीत काय, पुन्हा माझी सकाळ सारखी स्थिती झाली.. अजिबात कशाची वाट न बघता मी