मायबोली

  • 6.2k
  • 2
  • 2k

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी , एवढ्या जगात माय मानतो मराठी । ” . २७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो . मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते “विष्णू वामन शिरवाडकर” ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो . जीवनलहरी, किनारा ,मराठी माती ,वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहे. तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला ,नटसम्राट ,राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत. वैष्णव ,जान्हवी ,कल्पनेच्या तीरावर या कादंबर्‍या अशा अनेक साहित्यिक कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेचे महत्त्व लोकांसमोर मांडले