सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ३

  • 7.6k
  • 3.5k

पोटभर रुचकर नाष्टा करून तृप्तीचा ढेकर दिला.. आता दुपारी वेळेत जेवायला उशीर झाला तरी चालू शकणार होते.आमच्या रिक्षा तयार होत्याच, आम्हाला हंपी दर्शन घडवून आणण्यासाठी..आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही गणपतीच्या दर्शनाने केली..आमच्या होम स्टेच्या जवळच असलेल्या हेमकूट टेकडीवरहे गणेश मंदिर आहे..हंपीचा इतिहास जरी तुम्ही वाचून गेला असलात तरी तिथला लोकल गाईड घ्यावा असं अनुभवाने मी सांगेन..त्यामुळे होते काय, आपण वाचलेल्यापैकी जे काही पॉइंट्स आपल्याकडून राहून जातात ते एकतर गाईडकडून कव्हर होतात आणि दुसरं म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांचे कमाईचे मुख्य साधन टुरिस्ट हेच आहे.. तर आपण नकळत त्यांना आर्थिक मदतही करत असतो. आम्हीही तिथला ऑफीशियल गाईड बरोबर घेतला.आता ज्या गणपती मंदिराबाबत मी