आसाम मेघालय भ्रमंती - 6 - अंतिम भाग

  • 7k
  • 2.8k

#आसाम_मेघालय भ्रमंती ६ सकाळी उठून लगेज आवरून बाहेर ठेवले आणि नाष्टासाठी खोलोंग रेस्टॉरंट या डोंगर गुहेचा फिल देणाऱ्या हॉटेलच्या हॉलमध्ये आलो.भरपेट नाश्ता करून तिथे बाहेर असलेल्या भव्य टारझन द ऍप मैंन पुतळ्याबरोबर भरपूर फोटो काढले.एकूणच इथला परिसर मस्त होता .पुढचा प्रवास सुरू झाला. काझिरंगा ते गुवाहटी हा प्रवास दोनशे किलोमीटरचा पल्ला होता त्यामुळें आजचा दिवस प्रवासातच जाणार होता.आमची सहल आता शेवटच्या टप्प्यात आली होती. प्रवासादरम्यान आमच्या कारचालकाशी गप्पा चालल्या होत्या.पर्यटन व्यवसायावर त्यांचे जीवन अवलंबून असल्याने लॉक डाऊन काळात त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर फारच वाईट परिणाम झाल्याचे त्याच्या बोलण्यात जाणवले...गप्पा टप्पा करत आमचा प्रवास चालू होता.रस्त्यात कालाजुगी येथील प्रचंड मोठे शिवाचे मंदिर