आसाम मेघालय भ्रमंती - 4

  • 6.5k
  • 2.8k

#आसाम_मेघालय भ्रमंती ४ आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस होता.सकाळी आठ वाजता एम क्राऊन हॉटेलचा मनसोक्त नाश्ता करून आम्ही आपापल्या गाड्यांमध्ये येऊन बसलो.आधीच्या कार्यक्रमाप्रमाणे सकाळी शिलाँग येथील प्रसिध्द डॉन बॉस्को म्युझियम बघणार होतो परंतु नुकत्याच शाळा सुरू झाल्याने म्युझियमकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते त्यामुळे म्युझियम संध्याकाळी बघायचे ठरले आणि आम्ही सोहरा अर्थात चेरापुंजी...सर्वात जास्त पर्जन्यमान असलेला प्रदेश बघण्यासाठी कूच केले. या भागात अनेक छोटे मोठे धबधबे आहेत.या सीझनला जरी ते कोरडे असेल तरी पावसाळ्यात नक्कीच त्यांचे सौदर्य अप्रतीम असणार, त्यापैकी एक भव्य एलिफंट फॉल्स आम्ही बघणार होतो.तीन टप्प्यात कोसळणाऱ्या या धबधब्याकडे जाण्यासाठी बऱ्याच ओबडधोबड पायऱ्या उतरून जाव्या