आसाम मेघालय भ्रमंती - 2

  • 7.1k
  • 3.3k

#आसाम_मेघालय भ्रमंती २ पुणे ते हैद्राबाद तसा तर केवळ एक तासाच्या आतच संपणारा प्रवास;पण आम्हा दोघांचाही हा पहिला विमान प्रवास होता त्यामुळे असेल;पण विमानात बसल्यापासून आत आणि बाहेर खिडकीतून आमच्या दृष्टिक्षेपात येणाऱ्या प्रत्येक घटना आणि दृष्याकडे अगदी लहान मुलाच्या कुतूहलाने आम्ही दोघेही बघत होतो.आयुष्यातल्या पहिल्या एस टी प्रवासाचा किंवा पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद जेव्हढा लहानपणी झाला होता किंबहुना त्यापेक्षा जास्तच आनंद या प्रवासात मिळाला असावा.वयाच्या साठीनंतर दुसरे बालपण सुरू होते असे म्हणतात ते काही खोटे नाही... असो...हैद्राबादच्या राजीव गांधी विमानतळावर उतरून आम्हाला कनेक्टेड विमान सुटणार होते त्या गेटला पोहोचायचे होते.मित्रांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सिक्युरिटी चेक, बॅग स्कॅनिंग आदी सोपस्कार पूर्ण करून