पासपोर्ट - भाग ३ (अंतिम )

  • 6.1k
  • 2.8k

पासपोर्ट  भाग  ३   भाग २ वरुन पुढे वाचा.     रंगनाथ साहेबांनी सांगितलं की हे काम इतक्या सहजा सहजी होत नाही. तुम्हाला पासपोर्ट मिळेल पण आठवडा तरी लागेल. तुमचे पेपर इंडियात जातील तिथे scrutiny होईल मगच तुम्हाला प्रोविजनल पासपोर्ट मिळेल. आता काय करायचं ? सुनीता बाई जवळ इतके दिवस हॉटेल मध्ये राहण्या साठी पैसेच नव्हते. त्यांना रडायला यायला लागलं. रंगनाथन ला काही माहीत नव्हतं. त्यानी खोदून खोदून  सुनीता बाईंना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे म्हणून. “हॉटेल वाला म्हणतो की ट्रॅवल चं बूकिंग आज संध्याकाळ पर्यंतच होतं. आता तुम्हाला इथे राहता येणार नाही कारण तुमच्या जवळ पासपोर्ट नाहीये. आणि तरीही