सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग २

  • 8.2k
  • 4.3k

मुंबईहून निघताना ट्रेन प्रवास सोयीस्कर वाटत नसल्याने ग्रुप लीडर्सनी वातानुकूलित स्लीपर बसची तिकीटे काढली..ही बस साधारण दुपारी तीनच्या दरम्यान बोरिवलीवरून सुटते आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर, हुबळी , गदग,हॉस्पेट असा प्रवास करून सकाळी 8 वाजता हॉस्पेटला पोहचते. तिथून रिक्षाने हंपीला जाण्यास अर्धा तास लागतो..नशिबाने आमची बस अगदी वेळेवर हॉस्पेटला पोहचली.. यदा कदाचित जर बस उशिरा पोहचली तर आपला दिवसाचा सर्व कार्यक्रम बिघडू शकतो..अर्थात हे आपल्या हातात नसते म्हणा..आमचे रिक्षावाले अगोदरच हॉस्पेटला येऊन थांबले होते. आठ जणांसाठी दोन रिक्षा पुरेशा होत्या. एका रिक्षात पाठी तीन आणि ड्रायव्हर शेजारी पुढं एकजण.. इथे मुंबईची आठवण आली.( मुंबईच्या चाकरमान्यांना अशा चौथ्या सीटवर बसून प्रवास करणे