मी माझे तोंड गुडघ्यामध्ये खुपसून झोपडीत बसलो होतो. मंद प्रकाश देणाऱ्या दिव्याला सुद्धा माझ्या चेहऱ्यावरचे भाव कळून येत नव्हते. समोर बसलेली रफिया तेच भाव वाचण्याचा प्रयत्न करीत होती. शेवटी ती थकून माझ्या जवळ आली व माझ्या केसात हात फिरवून मला विचारले, "काय झालं बदरु? कोणाशी भांडलास का? कोणी काही बोललेय का? कोणी काही बोलले असेल आणि उदास असशील तर विसर, गरीबाला कसली आली इज्जत !" मला कळत नव्हते की तिला काय उत्तर द्यावे, कारण तिला माझ्या विषयी जास्त काही माहित नव्हते. आज माझ्या नशिबाने मला अश्या जागेवर आणून ठेवले होते जिथे दोन्हीकडे खोल दरी होती. रफियाने स्वतःचे प्रयत्न सोडले व