येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ६

  • 7.4k
  • 3.2k

भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही रूमवर आलो.. आर्या आणि अनिलही नुकतेच स्कुबा डायव्हिंग करून पोहचले होते..दोघांनीही स्कुबा डायव्हिंगचा मनसोक्त आस्वाद घेतला होता.. इथे स्कुबा डायव्हिंग इतर ठिकाणापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त आहे.. सहाशे रुपये माणशी घेतात.. त्यातच आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करून मिळतं.. सिंधूदुर्ग किल्ल्याच्या जवळ जे स्कुबा डायव्हिंग करतात तिथं करावं असा मी सल्ला देईन.. कारण अगोदरच्या वेळी आम्ही देवबागला केलं होत तिथं आमच्या पैकी काहींना त्रास झाला..( त्रास म्हणजे समुद्राच्या बरच आत बोट जेंव्हा उभी राहते आणि एकेक करून माणसं स्कुबा डायव्हिंग साठी जात असतात.. आम्ही जी लोकं बोटीत होतो त्यांना सतत वाऱ्याने हलणाऱ्या बोटीमुळे उलटी- मळमळ, चक्कर सारखं वाटत होतं..