येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ५

  • 7k
  • 3.2k

आज आमचे दोन ग्रुप झाले होते.मी आणि भावाचे कुटुंब आंगणेवाडी जायला निघालो आणि अनिल आर्या स्कुबा डायव्हिंग साठी.मालवण वरून आंगणेवाडी साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.. रिक्षाने जाऊन येऊन पाचशे रुपये पडतात.रिक्षाने साधारण तासाभरात आपण आंगणेवाडीत पोहचतो.. मालवण सोडले की सुरवातीला रस्ता सुस्थितीत आहे नंतर नंतर मात्र बऱ्यापैकी खराब रस्ता आहे..दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंगणेवाडीच्या जत्रेला येतात.. शासनाने पुढाकार घेऊन जिथं जिथं रस्त्याची दुरवस्था आहे तिथं डांबरीकरण करून घेतलं तर भाविकांना होणारा त्रास नक्कीच कमी होईल..रस्ता खराब होता पण सोबत असलेला हिरवागार निसर्ग , नागमोडी वळणे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं यामुळे प्रवासाचा त्रास जाणवत नाही..या प्रवासातील अजून एक प्रकर्षाने जाणवलेली