सत्यमेव जयते! - भाग २

  • 9.3k
  • 5.1k

भाग २ कालच्या महालक्ष्मी वर घडलेल्या प्रसंगामुळे तिचं पूर्ण आयुष्य संपले होते. एका रात्रीच बऱ्याच गोष्टीचा सामना तिच्या आई वडिलांना करावा लागला. पण याची भनक देखील तिला नव्हती. कारण ती तर जिवंत असूनही या जगात नसल्यासारखी एकदम शांत होऊन बेडवर पडली होती. सकाळी उशिरा तिने डोळे उघडले होते, पण चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे हावभाव तिच्या नव्हते. सगळं तेज तिच्या चेहऱ्यावरचे कमी झाले होते. होते फक्त ते नखांचे ओरखडे अंगावर आणि ते पाहून तिच्या आईला रडू येत होतं. त्या स्वतःच्या हातांनी तिचं अंग साफ करत होत्या. पण मनावरचा आघात मात्र त्यांना पुसता येत नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांची हसणारी मुलगी आज अचानक शांत