बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 4

  • 6.4k
  • 2.6k

"याना केवज् " बघून मन एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं होतं.. अद्वितिय, अध्दभुत अनुभव!!पण तिथेच घुटमळून चालणार नव्हतं.. आजच्या दिवसातील शेवटचं आकर्षण "मिर्जन किल्ला" अजून बाकी होता.. साधारण चार वाजता याना केवज् हून निघालो आणि अर्धा पाऊण तास लागतो मिर्जन किल्ल्याजवळ पोहचायला.. पण हा अर्धा पाऊण तास आमच्या साथीदारांनी त्यांच्या नृत्य अविष्कारांनी अविस्मरणीय केला..बेभान, भन्नाट, लई भारी!! कोणत्या उपमा देऊ ?शब्द नाहीत माझ्याकडे..तुमच्या सगळ्यांच्या जिंदादिलीला सलाम मित्रांनो!!नृत्याच्या जादुई दुलईवर तरंगत तरंगत कधी किल्ल्याजवळ पोहचलो समजलेच नाही..अगदी गाडीतून उतरल्या उतरल्या प्रथम दर्शनीच हा भुईकोट किल्ला आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो ..सुंदर स्थापत्यकलेसाठी ओळखला जाणारा दुहेरी तटबंदीचा हा किल्ला "लॅटराइट दगड "वापरून बांधला गेलाअसून