आरोपी - प्रकरण २

  • 12.9k
  • 8.7k

प्रकरण २ दुसऱ्या दिवशी ऑफिस उघडलं तेव्हा दहा नंतर सौम्या चा इंटरकॉम पाणिनी पटवर्धनांच्या केबिन मध्ये वाजला. “बाहेर मिस अलुरकर आली आहे.” सौम्या म्हणाली “मिस अलुरकर कोण?” पाणिनी ने कपाळावर आठ्या घालत विचारलं. “सर. मिस अलुरकर म्हणजे काल आपल्याला भेटलेली वेट्रेस, क्षिती अलुरकर. तुमचा अंदाज बरोबर ठरला सर, ती आली आज ऑफिसला.” “अरे वा ! तिला आत पाठव सौम्या, आणि तू ही ये.” “मिस्टर पटवर्धन मी खरंच माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, तुमचे कसे आभार मानू मला समजून घेतल्याबद्दल ! आणि आजची अपॉइंटमेंट दिल्याबद्दल” पाणिनी हसला, “मला वाटतं किती मी दिलेली टीप पुरेशी होती कालची?” क्षिती ने आपल्या पर्समधून