डिकीतला सस्पेन्स - भाग ४ (अंतिम)

  • 9.5k
  • 4.4k

डिकीतला सस्पेन्स  भाग ४ (अंतिम)   भाग ३  वरून पुढे वाचा ......... पोलिस स्टेशन मधे  रामभरोसे आणि त्याचा दोस्त यांना आणल्यावर, अर्धा तास त्यांना तसंच बसवून ठेवलं. त्या लोकांची सारखी चुळबुळ चालली होती.अधून मधून त्यांच्याकडे कटाक्ष टाकत होते, सांगोळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होते. त्यामुळे रामभरोसेची अस्वस्थता आणखीनच वाढत होती. अगदी हलक्या स्वरात ते एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगोळे टिपत होता. अर्धा तास झाल्यावर रामभरोसेचा संयम सुटत आला होता. तो सांगोळेला म्हणाला “और कितनी देर हमे बिठाके रखेंगे ये तो बता दो. अरे साब हमने कुछ नहीं किया हैं.  क्यूँ सता रहे हो ?”