डिकीतला सस्पेन्स - भाग २

  • 8.6k
  • 4.6k

डिकीतला सस्पेन्स भाग  २ भाग १ वरून पुढे  वाचा .......... “गुड.” धनशेखर म्हणाले. मुलीची ओळख पटल्यामुळे त्यांना जरा समाधान वाटलं. आता शोध घेणं सोपं होणार होतं. “सर्विस प्रोवायडरला लोकेशन विचारा. बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन.” दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला. आणि लगेच पोलिस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली. साठे साहेब दुपारी आले. आल्यावर धनशेखरांनी विचारपूस सुरू केली. “साहेब, तुम्ही दिनेश घारपुरे यांना ओळखता ?” – धनशेखर “हो, माझा मित्र आहे, आणि तो लग्नाला येणार होता, पण बहुधा गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असावा म्हणून येऊ शकला नाही, असं वाटतंय. पण तुम्ही हे का विचारता आहात ?