गुंजन - भाग ५

  • 8.8k
  • 5.2k

भाग ५. गुंजन आणि तो सोबतच खाली येतात. तसे, वेदच्या घरचे काही लोक रागातच गुंजनला पाहायला लागतात. त्यांच्या नजरा पाहून गुंजन काहीशी घाबरून वेदच्या जवळ थांबते. वेद तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो. ते पाहून ती लोक आणखीन खवळतात. "वेद, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला कळवले देखील नाही !! पण, आम्हांला त्याच काही वाटलं. आता तुमच्या बायकोने जे काही केलं ते आम्हाला बिलकुल पसंत नाही पडलं"एक मध्यम वयाची बाई त्याच्याजवळ येत रागातच म्हणाली. गुंजनला अजून धड वेदच्या परिवारासोबत ओळख देखील झाली नव्हती आणि त्यात आता ती लोक अशी बघत होती जस काय तिने खूपच मोठं चुकीचे केलं आहे?