गुंजन - भाग ४

  • 10.5k
  • 5.6k

भाग ४. मागील भागात:- "गुंजन चॅनेलचे १ मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत. त्यात तुझा व्हिडीओ २० लाख लोकांनी पाहिला आहे.त्यामुळे तुला बऱ्याच इंडस्ट्रीकडून फोन येत आहे. हे तर आनंदाची गोष्ट आहे यार आणि तू कसा चेहरा करून बसली आहे. चल खुश हो!!"वेद हसूनच बोलतो. "व्हिडीओ कसा मिळाला तुम्हाला? तुम्ही ओळखता काय मला आधीपासून?"गुंजन त्याच्याकडे नजर रोखुन पाहत बोलते. तिचं ते बोलणं ऐकून तो शांत होतो. आतापासून पुढे:- वेद काहीवेळ शांतच राहतो. कारण गुंजनला काय सांगावे? याचा तो विचार मनातच करत असतो. पण त्याला तिच्यापासून काही लपवायचे नव्हते. त्यामुळे तो एक मोठा श्वास घेतो आणि सोडतो. "तुला मी जेव्हा पासून पाहिले ना?