गुंजन - भाग १

(12)
  • 20.6k
  • 2
  • 13k

गुंजन....भाग १ ही कथा आहे एका अश्या मुलीची जिने बरीच स्वप्न पाहिली होती आपल्या वयात,पण काही कारणाने तिची स्वप्न अपूर्ण राहतात.काय आहे तिचं स्वप्न?करेल का ती ते पूर्ण ते या कथेत पाहायला मिळेल. --------------- "मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वेद जाधव यांचे अचानक लग्न सांगलीचे आमदार भूषण विखे-पाटील यांची एकुलती एक कन्या गुंजन विखे-पाटील सोबत झाले आहे. या लग्नाचे नक्की कारण काय आहे?हे जाणून घ्यायची सगळयांना उत्सुकता लागली आहे.पण जाधव परिवार मीडियाला उत्तर द्यायला टाळत आहेत"एक रिपोर्टर हातात आपला माईक पकडून मोठ्याने ओरडतच टीव्हीवर बोलत असतो.ती न्युज पाहून तिचे डोळे भरतात. एका मोठ्या अश्या मॉर्डन बेडरूममध्ये ती लाल घागरा चुनरी घालून बसली