काल रात्री आमच्या दोघांच भांडण झालं होतं. कारण तसं नेहमीचच होतं आणि भांडण ही रोजचच होतं. भांडणांच एकमेव कारण म्हणजे त्याच्याकडुन मला वेळच मिळत नव्हता. रोज संध्याकाळी कामावरून दोघेही घरी गेल्यानंतर मला त्याला खुप काही सांगायचं असायचं पण त्याचं घरी आल्यानंतर ही काम असायचं. कधी कधी कंटाळा येतो त्याच्या कामाचा मग असं वाटतं नको ते काम तुझं आणि नको ती नोकरी. पण नेहमी सारखच काल रात्री ही झालं मी घरी आल्यानंतर कामं आवरून जेवण वगैरे झाल्यावर त्याच्याकडून थोड्या वेळाची अपेक्षा केली आणि त्यानेही नेहमी सारखं फ्री होण्यासाठी थोडा वेळ मोबाईल वापरायला सुरुवात केली. मला खुप बोलायचं असतं पण मोबाईल दोघांकडेही