रात्र खेळीते खेळ - भाग 5

  • 13.1k
  • 6.5k

त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून अनुश्रीच्या जागी येवून झोपली.........खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लागले. राजला त्या वाऱ्यामुळे शहारा येवू लागला. तो अंगावरच पांघरूण वर घेवू लागला. पण तरीही थंडी वाजतच होती. त्याला तो बाहेरून येणारा वारा असह्य होवू लागला. तो खिडकी लावण्यासाठी वरती उठला आणि जागीच खिळला. बाहेरच्या गर्द अंधारातून दोन डोळे त्याच्यावर नजर रोखून होते रागाने लाल झाल्यासारखे ती समोरची व्यक्ती तर दिसत नव्हती पण ते डोळे मात्र चांगलीच भिती भरत होते मनात. राजला पुढे जायच धाडस होईना तरीही