असाही एक त्रिकोण - भाग 2

  • 7.9k
  • 1
  • 4.4k

असाही एक त्रिकोण  भाग  २ भाग  १ वरुन पुढे वाचा........... हा एवढा अपमान झाल्यावर दोघी जणी तिथे थांबण शक्यच नव्हतं. पण हा प्रसंग यशोदेच काळीज विदीर्ण करून गेला. त्या नंतर ती कुठे बाहेर निघेनाशी झाली. आतल्या आत कुढत राहिली. घरातल्या सगळ्या कामाचा भार तिने आपल्या अंगावर घेतला. तिला कसं समजवाव हे रेवती आणि हरीहरला कळत नव्हतं. दिवस असेच जात होते. अशातच तिचा भाऊ एक दिवस तिला न्यायला आला. तो तिला घरी चल म्हणत होता. “आता इथे तू आश्रित म्हणून राहणार, त्यापेक्षा माझ्याबरोबर चल. तिथे तुला काही खायला प्यायला कमी पडणार नाही अस म्हणाला.” तो असं म्हणाला खरं पण त्यांची देह