अकल्पित - भाग १

  • 12k
  • 5.1k

अकल्पित भाग १ रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, पेपर वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन ची आई, ही मंडळी कार्टून नेटवर्क बघत होती. सचिन ची बायको, वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती. बाहेर सोसायटी च्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती. अशातच एक काही तरी जड वस्तु पडल्याचा धडाम असा आवाज आला. सचिन ने मान वर करून इकडे तिकडे पाहिलं. रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपर मध्ये डोक घातलं. आणि शेजारच्या