पंढरपूर वारी

  • 8.8k
  • 3.7k

रमले मी संसारी, परि इच्छा होती एक उरी , पंढरीच्या दारी, पुण्य लाभले जन्मजन्मांतरी !! बरेचदा मनात असलेली तीव्र इच्छा पूर्ण होण्याचे भाग्य सगळ्यांना लाभते का ? अजिबात नाही ; काही थोडेच असे भाग्यवान असतात. पण मला सांगायला आनंद होतो, की अशा थोड्याच भाग्यवानांपैकी मी एक आहे. पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वरमहाराज आणि तुकाराममहाराज यांच्या पालख्या, वारक-यांच्या दिंड्या, त्यांचे अनुक्रमे आळंदी आणि देहू या गावांमधून निघून ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता सतत २१ दिवस पंढरपूरला पायी जाणे हे शब्द कानावर पडत होते. असे वाटायचे की आपणही  कधी तरी या वारीत सामील होऊन हा अद्वितीय अनुभव घेऊ शकू का ? माझे आवडते समाजकार्य चालूच होते. पण दरवर्षी जुलै महिना उजाडला की पंढरपूरच्या वारीचा विचार