पाठराखीण

  • 7.7k
  • 2.6k

पाठराखिण ती एकटीच वाट चालत होती.तिचा चेहरा निर्विकार होता. आजंबाजूला काय चाललंय याच तिला भान नव्हते आणि त्याची तिला पर्वा सुद्धा नव्हती.वेळ रात्री दहाची होती.अश्या वेळी ती गावानजिकच्या जंगलाकडे चालली होती.सात-आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेली ती नवविवाहिता...या अंधारात मिसळून अंधाराचाच एक भाग झाली होती. तिला शोधण्यासाठी तिच्या मागून कुणी येईल अशी अजिबात शक्यता नव्हती. ती आता जंगलात शिरली होती.गर्द झाडी..भूतांसारखी दिसणारी उंच झाडे...पान सळसळण्याचा आवाज...अधून मधून उठणारी कोल्हेकूई...रातकिड्यांची किरकिर..वटवाघळांचा विचित्र चित्कार..सारे वातावरण भयाण होत.ती पहिल्यांदाच इथ आली होती.इतरवेळी रात्री या जंगलात पाय ठेवण्याचे धाडस तिने केल नसत. सासरी आल्यावर तिने या जंगलाबद्दल बरंच काही ऐकलं होत.जंगलात भूत असून ती माणसांना झपाटतात.