रांगडं कोल्हापूर .. भाग २

  • 7.5k
  • 3.2k

आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला...अनिल छत्री उघडणार इतक्यात,"आरं , भिजं की मर्दा थोडंएवढं भिजल्यानं तुज्या अंगाला मोड नाय येणार !!"राजेंद्रने जी कोपरखळी मारली त्याने मलाही हसू आलं..गाडीशी पोहचेपर्यंत मस्त कोल्हापूरचा पाऊस एन्जॉय केला..आता वेध लागले होते , जोतिबाच्या दर्शनाचे!!ऐन जून महिन्यात आम्ही देवाच्या भेटीला चाललो होतो.. त्यामुळं कधी पावसाची रिपरिप तर कधी मध्येच मुसळधार.....त्याच्या मनाला येईल तसा तो बरसत होता आणि त्याच्या सोबतीला दाट धुकं !!जोतिबाचा घाट ऐन पावसाळ्यात चढताना थोडी काळजी घ्यावी... वाकडी तिकडी वळणे आणि अचानक समोरून येणारी वाहनं , नवखा माणूस नक्कीच भांबावून जाईल...घाटमाथ्यावर सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून , तिथून दिसणारे कोल्हापूर शहर