रक्तकांड - 2

  • 8.2k
  • 4.3k

प्रकरण-२ दहावीचा रिझल्ट लागला आणि रूपाने आपल्या शाळेच्या मैत्रिणीबरोबर एकत्र येऊन एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतले. दोन महिन्यातच कॉलेज सुरु झाले. शाळेच्या वातावरणापेक्षा कॉलेजचे वेगळे वातावरण बघून रूपा खुश झाली होती. मुलींचे वेगवेगळे रंगीबेरंगी ड्रेस, त्यांच्या हेअर स्टाईल्स, त्यांचे उंच उंच सँडल्स हे बघून रुपाला वेगळेपणा वाटू लागला होता. मुलांमुलींनमधील वागण्यातला खेळकरपणा, मोकळेपणा, बघून रुपाला आश्चर्य वाटत होते. हळू हळू कॉलेजच्या वातावरणात रूपा आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये रुळून गेली होती. क्लास बुडवून पिक्चरला जाणे, हॉटेलला जाणे, या गोष्टींकडे रूपाच्या मनाचा कल जाऊ लागला. नवं नवीन मित्र मैत्रिणी मिळू लागल्या. नवे अनुभव येऊ लागले, एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे मौज मजा यामध्ये रूपा आपले