बायको माझी प्रेमाची! - 3 - अंतिम भाग

  • 9.3k
  • 4.3k

३) आपुले मरण आपणच पहावे याप्रमाणे मी जणू निर्जिवास्थेत स्वयंपाकघरात पोहचलो, भाजी आहे का नाही हे पहावे म्हणून फ्रीज उघडले आणि पाहतो तर काय फ्रीजमध्ये सारा स्वयंपाक जणू माझीच वाट पाहत होता. मी एक-एक भांडे बाहेर काढून उघडत गेलो, संपूर्ण स्वयंपाक तयार होता, अगदी स्पेशल स्वीट डिश तीही माझ्या आवडीची...बासुंदी! मला आश्चर्याचा धक्का बसला. हा काय प्रकार? देव पावला काय? शीलाच्या भक्तीचा तर हा प्रसाद नव्हे? मी देवाकडे पाहात हात जोडले आणि त्याच हाताने का कोण जाणे मोबाईल उचलला. पुन्हा शीलाचा नंबर डायल केला. "अहो, हे काय? एक दिवस तर सुखाने झोपू द्या." "म्हणजे तू चक्क झोपलीस?" "मग? अहो, तुम्हाला