बदलणारे चेहरे! - 3 - अंतिम भाग

  • 7.9k
  • 1
  • 3.1k

भाग - ०३. गाडी गेटमधून आत शिरताना पाहून वॉचमनने तिला अडवले. अनोळखी गाडी पाहून त्याने तसे केले. "कोण आहे?" तिने काच खाली केली; तोच त्याने सलाम ठोकला. "अरे मॅडम तुम्ही!" "का?" "काही नाही!" तिने वेगाने गाडी गेटमधून आत घुसवली. गाडीतून बाहेर पडत नोकरांना प्रश्न न विचारता सामान आत ठेवायचा इशारा केला. सर्व काही पाहून सुद्धा नोकरांनी शांतपणे सामान आत ठेवून घेतले. ती थेट तिच्या खोलीत निघून गेली. दमली असल्याने तिला लवकरंच झोप लागली. सकाळी १० च्या सुमारास तिला जाग आली. तिने स्वतःचे आवरले आणि ऑफिस निघून गेली. ऑफिसमध्ये तिला शांत पाहून अक्षत तिच्या जवळ येऊन बसला. "Hey, how was your