अगा जे घडलेचि आहे! - 3

  • 5.3k
  • 2.2k

३. मध्ये पंधरा एक दिवस गेले असावेत. मी आता ते सारे विसरून गेलो. म्हणजे तसे ठरवून टाकले मी की मी ते विसरलोय. खरेतर सहानींकडून फोन येणार होताच. मेंदूतही अडगळीचा कप्पा असावा त्यात सारे टाकून मी त्या अनामिक सुकन्येस विसरायचे ठरवून टाकले. आणि एके दिवशी सकाळ सकाळी सहानींकडून फोन आला. तिला विसरण्याचा निश्चय आनंदाने मोडत मोठ्या उत्साहाने फोन उचलला मी. पण त्या मंजूळ ध्वनी ऐवजी पलिकडून एका सहानींचा भसाडा आवाज.. "क्या हुवा पुत्तर.. आए नहीं तुम. ओ पापाजीके पेपर थे.." "अच्छा तो आप आ गए वापस जी?" "वापीस? हम कहां जाएंगे? हम तो इधरही है.. आज तो आ जाओ.. कितने दिनोंसे