अगा जे घडलेचि आहे! - 2

  • 5.5k
  • 2.3k

२. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परतलो. दरवाजा उघडाच होता. आतून कुणी बाहेर यायचे चिन्ह दिसेना. झोपाळा रिकामाच होता. मी बेल वाजवली तशी ती बाहेर आली. छानच दिसत होती. मी आत शिरणार तोच म्हणाली, "सॉरी. बाबांना अर्जंट जावे लागले गावी. त्यांच्या काकाचा मुलगा एकाएकी वारला. कालच गेले ते. एवढ्या तडकाफडकी जावे लागले ना की त्यांच्याशी पेपर्स बद्दल काही बोलूही नाही शकली ताई. तुम्ही ही फाईल तुमच्याकडेच ठेवा. सॉरी हां.. काल घाईत तुमचा नंबरही नाही घेतला तिने. उगाच खेप पडली तुम्हाला." उगाच खेपेचे काही नाही. तिला बघायला मी दररोज यायला तयार होतो. पण ही अशी का ती आणि तिने म्हणतेय? "चांगला तरणाताठा हो..