मैत्री दिनानिमित्त

  • 8.3k
  • 2.7k

"मम्मी उद्या आहे फ्रेंडशिप डे ,आणि क्लासहून मी परस्पर जाणार आहे मैत्रिणीकडे..."माझ्या मुलीने माझं लिखाण वाचून वाचून जुळवलेलं यमक "अरेच्चा, आपल्या कसं आलं नाही हे ध्यानी...माझे काय प्लॅन आहेत बरं मैत्रीदिनी.."आता प्लॅन करायचं म्हटलं तर एकच मैत्र नाही ना मला.. वेगवेगळ्या टप्यावर , वाटेवर भेटलेले ढिगाने आहेत..माझ्या लेकीचं बरं आहे... तिला सध्या तरी एकच बेस्ट फ्रेंड आहे..असू शकतं ना असं..एकच मैत्र जो सर्वार्थाने परिपूर्ण...की....आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी ,त्या जपण्यासाठी वेगवेगळे मित्र वा मैत्रिणी ??विचार करण्यासारखी गोष्ट आहे ....असू शकतं किंवा नाहीही....बघा ना... आपले खूप सारे मित्र असतात आणि त्यांचं असं प्रत्येकाचं काहीतरी खास!! व्यक्ती तितक्या प्रकृती ....अर्थात त्या