यशवंत गाडीवरील रहस्य

  • 14.9k
  • 5.1k

यशवंतगडावरील रहस्य मम्मी...आम्ही सगळे किल्ल्यावर जाऊ? " केतकी मम्मीला लाडीगोडी लावत होती. "नको. अजिबात नको. "मम्मीने केतकीला साफ धुडकावून लावल. तेवढ्यात बाजूलाच बसलेली मोठी आई बोलली. " यशवंतगडावर नको बाई. हल्ली रात्रीचे कसले कसले आवाज येतत. खाजनाच्या(खाडी) बाजून मशाली.. लाईटी दिसतत.. दोन वेळा लोकांनी कुणाच्यातरी किंकाळ्या सुध्दा ऐकल्यात..आताशा संध्याकाळनंतर कोणच जाणा नाय तिकडे." " पण त्या रात्री! आता तर सकाळ आहे. " केतकी हटूनच बसली. "मला काही सांगू नकोस. पप्पांना विचार." मम्मीने आ- पले हात झटकले